तुम्हालाही छातीत जळजळ आणि आंबट ढेकरचा त्रास होतोय? ॲसिडिटी कमी करण्यासाठी 10 सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

ॲसिडिटी आणि पित्त त्रास

आजकाल कामाच्या धावपळीमध्ये खाण्यापिण्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. गॅस, अॅसिडिटी, पित्त, छातीत जळजळ होणे, मळमळणे किंवा तोंड कडू पडणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

Acidity Relief Tips | google

१० सोपे उपाय

तुम्हालाही जर पित्ताचा त्रास होत असेल, तर काही मिनिटांत आराम मिळवण्यासाठी हे १० सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा

Acidity Relief Tips | pinterest

पित्तक्षामक आहाराचे सेवन

आहारात गोड, कडू आणि तुरट चवीच्या पदार्थांचे प्रमाण वाढवा. हे पदार्थ शरीरातील वाढलेले पित्त शांत करण्यास मदत करतात.

Pitta-Pacifying Diet | yandex

तुपाचे सेवन

जेवणात किंवा रोजच्या आहारात तुपाचा समावेश करा. तूप पचनक्रिया सुधारून अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम देतो.

Consume Ghee | yandex

दुग्धजन्य पदार्थ व लोणी खा

थंड दूध, ताक किंवा घरचे लोणी खाल्ल्याने पोटातील उष्णता कमी होते आणि छातीत होणारी जळजळ शांत होते.

Dairy & Butter | yandex

गोड फळांचे सेवन

संत्री किंवा मोसंबीसारख्या जास्त आंबट फळांऐवजी केळी, डाळिब, पपई किंवा कलिंगड यांसारखी चवीला गोड आणि थंड फळे खावीत.

Eat Sweet Fruits | GOOGLE

आवळा खाणे फायदेशीर

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि थंड गुणधर्म असतात. आवळा किंवा आवळ्याचा रस घेतल्याने पित्त नियंत्रणात राहते.

amla | pinterest

सॅलडचा आहारात समावेश

जेवणात काकडी, मुळा, बीट आणि लिंबू यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. हे पोटाचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Cucumber, Radish, Lemon, Beetroot

भरपूर पाणी प्या

दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने पोटातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

Drink Plenty of Water | pinterest

थंड पाण्याने आंघोळ करा

उन्हाळ्यात किंवा पित्ताचा त्रास जाणवल्यास थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला आणि मनाला थंडावा मिळतो.

Cold Water Bath | Saam Tv

अतिआळस आणि अतिश्रम टाळा

शरीराला अति थकवणारे काम किंवा दिवसभर एकाच जागी बसून राहण्यासारखा अतिआळस टाळा, यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

Avoid Excessive Laziness & Labor | yandex

चहा-कॉफी टाळा आणि मेडिटेशन करा

चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे अ‍ॅसिडिटी वाढते. तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यान करा.

Avoid Tea/Coffee & Meditate | Yandex

NEXT: पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

येथे क्लिक करा...