Top 5 Signs of Liver Issues: डोळ्यांतील या खुणा सांगतात तुमचं लिव्हर कसं काम करतय? फॅटी लिव्हरची 5 लक्षणे वेळीच ओळखा

Manasvi Choudhary

लिव्हर

शरीरातील लिव्हर हा महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि रक्त शुद्ध करण्याचे काम करतो.

Liver

फॅटी लिव्हरची समस्या

पण आजकालच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरची समस्या वेगाने वाढतेय. यावरून शरीरात लिव्हरचे कार्य व्यवस्थित सुरळीत आहे की नाही हे ओळखा.

Fatty Liver Issues

डोळ्यांमध्ये दिसणारी लक्षणे

लिव्हरचे बिघाड झाल्यास त्याचे स्पष्ट संकेत डोळ्यांमध्ये दिसतात ही लक्षणे कोणती ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

eyes | pinterest

डोळे पिवळे पडणे

लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा झाल्यामुळे किंवा लिव्हरचे कार्य मंदावल्यास शरीरात 'बिलिरूबिन' चे प्रमाण वाढते. यामुळे डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडतो.

Yellow Eyes / Jaundice

डोळे कोरडे पडणे

शरीरात पाण्याची कमतरता असेल आणि डोळे सातत्याने कोरडे पडत असतील किंवा जळजळ होत असेल, तर ते खराब होत असलेल्या यकृताचे लक्षण असू शकते.

Dry Eyes | Google

डोळ्यांखाली काळी वर्तुळे

पुरेशी झोप घेऊनही जर डोळ्यांखाली सतत काळी वर्तुळे राहत असतील, तर याचा अर्थ यकृत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त ताण घेत आहे.

Dark Circles | PINTREST

डोळ्यांभोवती सूज

यकृताच्या प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे शरीरात द्रव पदार्थ साचू लागतात, ज्याचा परिणाम डोळ्यांच्या खाली किंवा पापण्यांवर सूज येण्याचे दिसते.

puffiness of eyes | pintrest

अंधुक दृष्टी

यकृताचे आरोग्य थेट शरीरातील रक्ताभिसरणाशी संबंधित मानले जाते. लिव्हर कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम दृष्टीवर होऊन अंधुक दिसू शकते.

Blurred Vision | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Clothes Washing Tips: कपडे धुण्यापूर्वी किती वेळ भिजत घालावेत? रात्रभर कपडे भिजवून ठेवल्याने कपड्यांचे काय नुकसान होते?

Clothes Washing Tips
येथे क्लिक करा..