Manasvi Choudhary
सकाळी दात न घासत चहा पिण्याची सवय अनेकांना असते. पण आरोग्याच्या दृष्टीने ही सवय अत्यंत चुकीची मानली जाते.
दात न घासता चहा प्यायल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
चहामध्ये अमिनो ॲसिड आणि टॅनीन असते. सकाळी तोंडातील बॅक्टेरिया पोटात जातात.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीरातील गॅस्ट्रिक संतुलन बिघडते, ज्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते.
रात्रीपासून तोंडात साचलेले बॅक्टेरिया आणि चहा एकत्र आल्याने श्वासाची दुर्गंधी ( आणि तोंडाचे आरोग्य बिघडण्याची समस्या निर्माण होते.
रात्रीपासून तोंडात साचलेले अन्नकण आणि बॅक्टेरिया हे चहामध्ये मिसळतात यामुळे तोंडाची दुर्गंधी वाढते आणि तोंडाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
चहामधील टॅनीन आणि रंगाच्या घटकांमुळे दातांवर पिवळसर थर बसतो. जर दात स्वच्छ न करता चहा प्यायला तर दात पिवळे होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.