ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक महिलांना केसांना काळी मेहेंदी लावायला आवडते यामुळे केस चमकदार परंतु याचा केसांवर दुष्परिणाम देखील होतात.
काळी मेहेंदी केसांना लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात, जाणून घ्या.
गरजेपेक्षा जास्त आणि सतत मेहेंदी लावल्याने केस जास्त प्रमाणात गळतात.
काही लोकांना मेहेंदी लावल्याने अॅलर्जी होऊ शकते. तसेच स्कॅल्पला खाज सुटणे, रॅशेज होऊ शकतात. मेहेंदी लावण्याआधी पॅच टेस्ट करा.
मेहेंदी लावल्याने टाळूवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू शकतात.
सतत मेहेंदी लावल्याने केस ड्राय होतात आणि लवकर तुटतात.
मेहेंदी लावल्यानंतर स्प्लिट एंड्स वाढतात म्हणून मेहेंदी लावल्यानंतर हेअर मास्कचा वापर करा.