ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्री- डायबिटीज एक अशी स्थिती आहे जेव्हा रक्तामध्ये शुगर लेव्हल सामन्यपेक्षा जास्त असते, परंतु डायबिटीज होण्याइतके नाही. हा डायबिटीजचा पहिला स्टेज मानला जातो.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारिरीक हालचीलीचा अभाव आणि जेनेटिक कारणांमुळे शरीर इन्सुलिनचे योग्यरित्या वापर करत नाही. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते.
प्री- डायबिटीजच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सतत थकवा जाणवणे सामान्य आहे. अशावेळी शरीरात उर्जा संतुलित नसते.
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित झाल्यामुळे एखाद्याला वारंवार तहान लागणे किंवा भूक लागणे अशी लक्षणे दिसू शकतात.
जेव्हा शरीर रक्तातील अतिरिक्त साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवते. हे प्री-डायबिटीजचे एक गंभीर लक्षण आहे.
प्री- डायबिटीजमध्ये डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो जसे की अधुंक दिसणे, याशिवाय त्वचेवर खाज सुटणे, काळे डाग येणे हे देखील प्री-डायबिटीजचे लक्षण आहे.