ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्लास्टिक हे पर्यावरणासह आपल्या आरोग्यासाठी देखील तितकेच हानिकारक आहे.
प्लास्टिकच्या बाटलीमधून सतत पाणी प्यायल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात,जाणून घ्या
प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी भरुन ठेवल्यास यामध्ये फ्लोराइड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियम सारखे हानिकारक तत्व उत्पन्न होतात. या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
सतत प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी प्यायल्याने कॅन्सर किंवा अंपगत्व सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
प्लास्टिकमधील हे केमिकल पाणीद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. सतत हे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
प्लास्टिक बनवण्यासाठी बिस्फेनॉल ए या केमिकलचा वापर केला जातो. यामुळे हे पाणी प्यायल्याने मधुमेह किंवा लठ्ठपणा सारखे हे आजार होऊ शकतात.
प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिण्यासाठी बीपीए BPA प्लास्टिक बाटलीचा वापर करा. तसेच याऐवजी काच, तांबे किंवा स्टीलच्या बाटलीचा वापर करा.