Sakshi Sunil Jadhav
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढतं वजन आणि बेली फॅट ही मोठी समस्या बनली आहे. अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण सुरुवात कशी करावी हे कळत नाही. चला जाणून घेऊयात.
रात्रभर शरीर डिहायड्रेट होतं, त्यामुळे सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो.
कोमट पाणी प्यायल्याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि फॅट बर्निंग प्रक्रिया फास्ट सुरू होते.
दररोज 20 ते 30 मिनिटं फास्ट चालल्यावर केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
अंडी, दूध, डाळी किंवा स्प्राउट्ससारखा प्रोटीनयुक्त नाश्ता करा. याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
जिममध्ये जाणं गरजेचं नाही. स्विमिंग, योगा, सायकलिंग किंवा डान्स यांसारखे आवडीचे व्यायाम केल्यावर सुद्धा वजन कमी होईल.
सकाळी हलकं स्ट्रेचिंग किंवा योगा करा. कमी वेळ जरी केली तरी शरीर लवचिक होतं आणि फॅट बर्निंगला मदत होते.
स्ट्रेस कमी करण्यासाठी 5 ते 10 मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम करा. याने वजन वाढत नाही.
सकाळपासूनच हेल्दी खाण्याची सवय लावा. साखर आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहणं गरजेचं आहे.
सकाळच्या या सोप्या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवू शकतात. नियमितपणे या सवयी पाळल्यास बेली फॅट कमी होण्यास मदत होते आणि तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता.