Manasvi Choudhary
घरामध्ये गंगाजल ठेवणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते.
मात्र घरामध्ये गंगाजल ठेवताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
घरामध्ये गंगाजल ठेवणे हे देव देवीतांचा आशीर्वाद आणि सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, गंगाजलमध्ये स्वत: गंगा माता वास करते. म्हणून त्याचा उपयोग पूजा, हवन, ग्रह प्रसन्नतेच्या विधींसाठी करतात.
घरामध्ये गंगाजल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते.
अनेक लोक घरामध्ये गंगाजल स्नानगृहात, स्वयंपाकघरामध्ये सिंकखाली आण जमिनीवर ठेवतात. मात्र शास्त्रानुसार, गंगाजल कधीही अपवित्र ठिकाणी ठेवू नये.
गंगाजल हे उंच आणि स्वच्छ अश्या ठिकाणी ठेवावे यामुळे घरात पवित्रता आणि सकारात्मकता येते. गंगाजल हे पूजेच्या घरात म्हणजेच देवघरात ठेवणे शुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.