Manasvi Choudhary
कडक्याच्या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे हिडायड्रेशनचा त्रास उद्भवतो.
अशा वेळी शरीर थंड ठेवण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही घरीच केलेल्या या ड्रिंकचे सेवन करा.
लिंबू सरबतमध्ये व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाईट्स हे गुणधर्म असतात. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी किंवा बाहेरून आल्यावर एक ग्लास लिंबू सरबत प्या.
उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते. थकवा दूर होतो.
ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड पचन सुधारते आणि शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते.
कोकम सरबत प्यायल्याने उन्हामुळे होणारी जळजळ कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.
नारळ पाणी हे निसर्गाचे 'एनर्जी ड्रिंक' आहे. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते