ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडाक्याच्या उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात अनेक लोक आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ भारतीय नाश्त्याबद्दल सांगणार आहोत, जे खाल्ल्याने शरीराला थंडावा सोबत उर्जा मिळेल.
उन्हाळ्यात नाश्त्याला तुम्ही दडपे पोहे खाऊ शकता. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल.
दही उपमा हा खूप हेल्दी नाश्ता आहे. याचे सेवन केल्याने शरीर थंड राहते.
उन्हाळ्यात नाश्त्याला इडली सांबार खा. यामुळे तुमचे पोट अधिक काळ भरलेले राहिल. आणि तुम्हाला दिवसभर उर्जावान वाटेल.
नीर डोसामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हेल्दी आणि टेस्टी नीर डोसाचा आहारात नक्की समावेश करा.
पंता भात हा पचनासाठी खूप हलका असतो. त्याचप्रमाणे शरीराला उर्जेसोबत थंडावा देतो.