No Onion Recipe : कांदा न वापरता बनवा 5 भाज्या, ज्या चवीसह आरोग्यालाही देतील फायदा

Manasvi Choudhary

कांदा

कांदा हा आहारातील महत्वाचा घटक मानला जातो. कोणत्याही भाजीमध्ये कांद्याचा वापर केला जातो.

Onion | pinterest

कांदा न वापरता बनवा भाज्या

परंतु, अनेकजण कांदा खाणे टाळतात. कांदा न वापरता कोणत्या ५ भाज्या बनवता येतात ते पाहूया.

vegetables | pinterest

फोडणीचा बटाटा

उकडलेल्या किंवा कच्च्या बटाटे बारीक कापून तेलावर जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद आणि हिरव्या मिरचीची खमंग फोडणी देऊन भाजी बनवा.

Jeera Aloo / Tempered Potatoes | Yandex

दुधी भोपळा आणि चणा डाळ भाजी

दुधी भोपळा हा पचनास अत्यंत हलका आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असलेला भाजीपाला आहे. भिजवलेली चणा डाळ, दुधी भोपळा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट (किंवा फक्त आले-जिरे) आणि सुके मसाले घालून केलेली ही भाजी प्रथिनांनी समृद्ध व चविष्ट होते.

Bottle Gourd with Chana Dal | pinterest

भेंडी मसाला

भेंडीची भाजी कांदा न घालताही खूप छान होते. भेंडी तेलात चांगली परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी, धणे-जिरे पावडर, आमचूर पावडर आणि शेंगदाण्याचे कूट मिक्स करा.

Masala Bhindi Recipe | SAAM TV

भोपळ्याची भाजी

लाल भोपळ्याची भाजी तुम्ही बनवू शकता. ही भाजी अत्यंत चविष्ट लागते. कांदा न वापरता मेथी दाणे, जिरे, हिंग, गूळ, चिंच किंवा आमचूर पावडर वापरून बनवलेली भोपळ्याची भाजी नक्की ट्राय करा.

Red Pumpkin Sabzi | Saam Tv

वांगी- टोमॅटो भाजी

वांगी आणि टोमॅटोची कांदा न वापरता बनवलेली रस्सा किंवा सुकी भाजी अत्यंत चवदार लागते.

Brinjal

NEXT: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी पाणी शिंपडल्याने काय होते?

Benefits of Sprinkling Water at Home Entrance Every Morning
येथे क्लिक करा...