ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा एखाद्या महिलेमध्ये हार्मोनल असंतुलन असते तेव्हा त्यामुळे थकवा, ताण, वजन वाढणे, मुरुमे आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे हार्मोन्स नैसर्गिकरित्या संतुलित होऊ शकतात.
हार्मोन्स संतुलित करण्यासाठी, ताण कमी करा. यासाठी योगासने, ध्यान, दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा आणि भरपूर झोप घ्या.
हार्मोनल संतुलन राखण्यासाठी प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहार घ्यावा. तुम्ही मासे, जवस आणि दूधाचे सेवन करू शकता.
झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. यासाठी ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे.
आहारात अश्वगंधा, मका रूट आणि शतावरी सारख्या हर्बल टीचा समावेश करा. हे चहा हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. परंतु, नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्ही दररोज चालणे, जॉगिंग, योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम केले पाहिजेत. यामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.