Manasvi Choudhary
डायबिटीज हा गंभीर समस्या बनली आहे. डायबिटीज या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवल्यास आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
डायबिटीजवर कोणत्याही गोळ्या- औषधं न खाता नियंत्रण मिळवायचे असेल तर आहारात तुम्ही बदल करणे महत्वाचे आहे.
काकडीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्यामुळे ती खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तसेच, यातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
फ्लॉवर भाजी रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. फ्लॉवरच्या भाजीमुळे आपले चयापचय सुरळीत होते. कारण मधुमेहीच्या रुग्णांना अन्न पचायला जास्त वेळ लागतो.
डायबिटीजवर कारल्याची भाजी रामबाण उपाय आहे. डायबिटीज असणाऱ्या रूग्णांनी आहारात कारल्याच्या भाजीचा समावेश करणे महत्वाचे आहे.
कोबी मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोबीतील अँटी-ऑक्सिडंट्स आणि 'अँथोसायनिन्स' शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.