Manasvi Choudhary
पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते यासाठी तुम्ही आहारात फळांचा समावेश करणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात कोणती फळे खाल्ली पाहिजेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डाळिंब पावसाळ्यात खाल्ले जाते. यात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
पावसाळ्यात जांभूळ हे फळ आरोग्यासाठी गुणकारी आहे. यात 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म संसर्गजन्य रोगांशी लढण्यास मदत करतात.
नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. पावसाळ्यात होणारी ॲलर्जी कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फळ गुणकारी आहे.
केळी खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. जर तुम्हाला पावसाळ्यात थकवा जाणवत असेल, तर केळी खा.