Manasvi Choudhary
उन्हाळ्यात फळे खाणे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. मात्र किडनीच्या रूग्णांसाठी काही फळांचे सेवन घातक ठरू शकते.
किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी कोणत्या फळांचे सेवन करू नये हे जाणून घ्या.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात या फळाचे सेवन केले जाते. ज्या रुग्णांना पाणी मर्यादित पिण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी कलिंगड खाणे टाळावे पोटामध्ये सूज येऊ शकते. पोटफुगी होते.
अनेकजण जेवणानंतर केळीचे सेवन करतात मात्र केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांच्या शरीरात पोटॅशियम साचल्यास हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
आंबट फळामध्ये पोटॅशियम जास्त असते यामुळे संत्री, लिंबू ही फळे किडनीच्या रूग्णांनी खाणे टाळावे.
किवीमध्ये ऑक्सलेट्स आणि पोटॅशियम दोन्ही जास्त असतात, ज्यामुळे किडनी स्टोन किंवा इतर समस्या वाढू शकतात.
एवोकॅडो आरोग्यासाठी फायदेशीर आहे मात्र किडनीच्या समस्या असलेल्यांनी खाणे टाळावे. एवोकॅडोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.