ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात ओल्या नखांमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. तसेच ओलाव्यामुळे नखांना आणि पायाला खाज येऊ लागते.
पावसाळ्यात नखांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या सिंपल टिप्स फॉलो करु शकता.
पावसाळ्यात घाणेरड्या पाण्यामुळे तुमच्या नखांसह पायाच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
ओलाव्यामुळे नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. म्हणून घरी आल्यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करा.
जर तुमच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अँटीफंगल पावडर लावा.
पावसाळ्यात बूट घालणे टाळा. त्याऐवजी हवेशीर चपले किंवा सँडल घाला.
पावसाळ्यात नखे वाढवू नका. यामुळे नखे ओली राहून कमकुवत होतात.