ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यातील वातावरण अल्हादायक वाटते. तसेच काहींना पावसात भिजायलाही आवडते. परंतु पावसाच्या पाण्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते.
पावसाच्या पाण्यापासून त्वचेची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.
पावसाच्या पाण्यात बॅक्टेरिया असतात. यासाठी पावसाच्या पाण्यापासून त्वचेची योग्य काळजी घेतली पाहिजे.
पावसाच्या पाणीमुळे त्वचेवर पिंपल्स, रॅशेज, खाज आणि अॅलर्जी सारख्या समस्या होऊ शकतात.
जर तुम्ही पावसात भिजला असाल तर घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने अंघोळ करा.
पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने चेहरा धुवा. तसेच चेहरा आणि अंग कोरड्या कपड्याने पुसा.
पावसाळ्यात घाम आल्यानंतर त्वचा तेलकट होते. यासाठी ऑइल फ्रि मॉइश्चरायजर वापरा.