ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होतो.
काही नात्यांमध्ये जोडीदार अनेकदा फसवत असतो. परंतु ही गोष्ट समजण्यासाठी वेळ लागतो.
विनाकारण राग करणे, छोट्या गोष्टींवर वाद घालणे या गोष्टी संकेत देतात की, तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत आहे.
अचानक भावनिक नात्यामध्ये दुरावा येणे हे देखील जोडीदार फसवत असल्याचे संकेत असू शकते.
जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून फोन लपवत असेल तर हे देखील एक संकेत असू शकते.
जर तुमचा जोडीदार वारंवार खोटं बोलत असेल तर हे देखील नात्यात फसवणुक होत असल्याचे संकेत आहे.
वागण्यात अचानक बदल होत असेल तर हे देखील फसवणुकीचे लक्षण आहे.