ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गेल्या काही वर्षात ३० पेक्षा कमी वय असलेल्या महिलांमध्ये म्हणजेच तरुणींमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि हार्मोनसमध्ये होणारे बदल हे कॅन्सरशी संबधित आहेत.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या, अनियमित मासिक पाळी, आणि हार्मोनल असंतुलन यामुळे स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, फास्ट फूड आणि जंक फूडमुळे वाढणारा लठ्ठपणा हे महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमुख कराण बनत आहे.
शारीरिक हालचालींचा अभाव आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे यामुळे देखील कॅन्सरचा धोका वाढतो.
हार्वर्ड हेल्थच्या मते, ज्या मुलींना खूप कमी वयात मासिक पाळी सुरू होते त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
तरुणींमध्ये वाढता ताण, करिअरचा दबाव आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळेही कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते.
कॅन्सर जेनेटिक्स जर्नलनुसार, जर एखाद्या मुलीच्या कुटुंबातील एखाद्याला यापूर्वी कर्करोग झाला असेल तर तिला हा आजार होण्याचा धोका दुप्पट होतो.