ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले सातारा जिल्हा धार्मिक स्थळे, किल्ले आणि थंड हवेच्या ठिकाणांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
पंचगणी म्हणजेच पाचगणी या नावाचा अर्थ पाच टेकड्यांची भूमी असा होतो. नैसर्गिक सुंदरताने नटलेले हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १३३४ मीटर उंचीवर वसलेले आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या या लेण्यांचा वापर ऋषींनी ध्यानासाठी केला होता. तसेच येथे भगवान कार्तिकेयचे मंदिर आहे.
पारसी पॉईंस हे पारसी समुदायाच्या नावावरुन ठेवण्यात आले. कृष्मा नदीच्या खोऱ्यावर वसलेले हे सुंदर अन् शांत ठिकाण पिकनिकसाठी बेस्ट आहे.
खाद्यप्रेमींसाठी मॅप्रो गार्डन परफेक्ट ठिकाण येथे तुम्ही स्ट्रॉबेरी फार्म तसेच बाकी फळांच्या बागांना भेट देऊ शकता. तसेच मिल्क शेक,आईसक्रिम आणि चॉकलेटचा आनंद घेऊ शकता.
टेकडीच्या माथ्यावर वसलेल्या सिडनी पॉईंटवरुन तुम्ही कृष्णा व्हॅली, धोम धरण आणि कमलगड किल्ल्याचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळेल. थंड वारा आणि शांत वातावरण निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
टेबल लँड हा आशियातील सर्वात मोठ्या पर्वतीय पठारांपैकी एक आहे. येथे तुम्ही घोडस्वारी, पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगच आनंद घेऊ शकता.