ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. सामान्य व्यक्तीने दिवसातून ७-८ तास झोप घेतली पाहिजे. यापेक्षा कमी झोप घेतल्याने तुम्ही अनिद्रेचा बळी ठरू शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जमिनीवर झोपल्याने शरीराला कोणते फायदे मिळू शकतात.
शरीरात रक्ताभिसरण चांगले असणे खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवते. जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण चांगले राहते.
ज्या लोकांना काम करताना अनेकदा मानदुखीचा त्रास होतो त्यांनी जमिनीवर झोपण्याची सवय लावावी.
जमिनीवर झोपण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो आणि सरळ पाठीच्या कण्यामुळे तुमचे पोट निरोगी राहते.
जर स्नायू दीर्घकाळ मजबूत ठेवायचे असतील तर जमिनीवर झोपावे. यामुळे तुम्हाला स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो.
संधिवात असलेल्या लोकांनी जमिनिवीर झोपणे टाळावे. यामुळे सांध्याचे आजार अधिक वाढू शकतात.