ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आंबा योग्य पद्धतीने खाणे महत्वाचे आहे. जेणेकरून शरीराला आंब्यातील पूर्ण पोषक तत्व मिळतील.
आंबा खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या ५ गोष्टींसोबत चुकूनही आंबा खाऊ नये. अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
आंबा नैसर्गिक रित्या शररीसाठी गरम असतो, तर दही थंड असते. आंबा आणि दही यांचे मिश्रण पचनसंस्थेवर परिणाम करू शकते.
आयुर्वेदानुसार, आंबा आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचनाच्या समस्या आणि ऍलर्जी होऊ शकतात. म्हणून ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.
आंबा नैसर्गिकरित्या गोड असतो. मसालेदार पदार्थांसोबत त्याचे सेवन केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे अॅसिडिटी आणि गॅस होऊ शकतो.
आंबा खाल्ल्यानंतर लगेचच कोल्ड्रिंक्स किंवा सोडा प्यायल्याने शरीरात साखर आणि अॅसिड जास्त प्रमाणात वाढू शकते. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
काकडी आणि कारले आंब्यासोबत खाऊ नयेत कारण ते पचनसंस्थेवर घातक परिणाम करु शकतात.