ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसेंदिवस फॅटी लिव्हरच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आकडेवारीनुसार, दर चारपैकी एका व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास असतो.
अनहेल्दी लाईफस्टाइलसह, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धुम्रपान आणि मद्यपान यासारख्या गोष्टींमुळे लिव्हर लवकर खराब होतो.
लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे टाळा, अन्यथा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो.
तळलेले पदार्थ, मैदाच्या पीठापासून बनलेले पदार्थ , ब्रेड, रेड मीट आणि जंक फूड खाणं टाळावे. याचा परिणाम लिव्हरवर होतो.
जास्त प्रमाणात गोड खाऊ नका, तसेच,चॉकलेट, पेस्ट्री, कॅन्डी, अतिप्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाण टाळा.
प्रोसेस्ड फूड, फ्राइट स्नॅक्स लिव्हरसाठी घातक आहे. हे पदार्थ शरीरातील इन्फ्लेमेशन वाढवतात.
मद्यपान करणे टाळा. मद्यपान आणि धुम्रपानामुळे इन्फ्लेमेशन वाढतो. यामुळे लिव्हरमध्ये जखमा होतात. आणि लिव्हरची क्षमता कमकुवत होते.