Manasvi Choudhary
सध्या अनेकांना डोळ्यांचा समस्या जाणवत आहेत. कामाचा ताण आणि सतत मोबाईल आणि लॅपटॉप पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो आहे.
निरोगी डोळ्यांसाठी तुम्ही नियमितपणे काही आय योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे मुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.
पामिंग हा आय योगा सर्वात आरामदायी आहे. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात घासा नंतर डोळे मिटून ते ऊबदार तळवे डोळ्यांवर ठेवा आणि थोडावेळ शांत बसा
डोळ्यांची हालचाल हा योगा महत्वाचा आहे. दर २० मिनिटांनी, २० फूट लांब असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पहा यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर आलेला ताण त्वरित कमी होतो
दिशादर्शन डोके स्थिर ठेवून फक्त डोळ्यांच्या बाहुल्या हलवा. वर, खाली, डावीकडे, उजवीकडे, तिरके पाहा
डोळ्यांच्या बाहुल्या हळूहळू घड्याळाच्या काट्याप्रमाणे आणि नंतर विरुद्ध दिशेने गोल फिरवा. असे ५-५ वेळा करा.
काम करताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करा. स्क्रीनकडे पाहताना आपण डोळे कमी मिटतो, ज्यामुळे ते कोरडे होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.