ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Manasvi Choudhary

वजन कमी करण्याचा सोपा मार्ग

आजकाल वजन कमी करण्यासाठी जिम हा सोपा मार्ग ठरला आहे. अनेकजण जिममध्ये तासनतास घाम गाळतात. मात्र तुम्हाला योग्य मशीन्स वापरण्याची पद्धत माहित नसेल तर जिममध्ये व्यायाम केल्याने शरीरावर फारसा परिणाम दिसत नाही.

Fast Weight Loss Tips

व्यायाम करण्याची चुकीची पद्धत

आपल्यापैकी बरेचजण म्हणतात की, जिमममध्ये तासनातस व्यायाम करून वजन कमी होत नाही यामागचं कारण म्हणजे व्यायाम करण्याची चुकीची पद्धत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जिममध्ये व्यायाम करत असाल तर त्याचा शरीरावर काहीही परिणाम होणार नाही.

Fast Weight Loss Tips

ट्रेडमिल

'ट्रेडमिल' हे जिममधील व्यायाम करण्याचे मशीन आहे. या मशीनचा वापर योग्य पद्धतीने केल्यास पायांचे स्नायू मजबूत होतात आणि कॅलरीज वेगाने बर्न होतात.ट्रेडमिलवर व्यायाम करण्याची योग्य पद्धत कशी आहे ती या वेबस्टोरीतून समजून घ्या.

Treadmil Workout Tips

२० मिनिटांचा सराव

वजन कमी करण्यासाठी नियमितपणे २० मिनिटे ट्रेडमिलवर धावण्याचा सराव करा यामुळे शरीरातील कॅलरीज अतिशय वेगाने जाळण्यास मदत होईल.

Treadmil Workout Tips

चढ- उतार ठेवा

व्यायामामध्ये गतीचा चढ-उतार ठेवा. १ मिनिट वेगाने धावा आणि १ मिनिट हळू चाला. ही प्रक्रिया १० वेळा करा. यामुळे चालण्याचा आणि धावण्याचा दोन्ही सराव होतो आणि हृदयावर किंवा पायांवर एकाच वेळी जास्त ताण येत नाही.

Treadmil Workout Tips

उलट दिशेने चाला

ट्रेडमिलवर काही वेळ उलट्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना ट्रेडमिलचे हँडल नक्की घट्ट पकडा, जेणेकरून तुमचा तोल जाणार नाही. यामुळे पायांच्या वेगवेगळ्या स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो.

Reverse Walk

फ्लॅट वॉक

गेल्या गेल्या थेट धावण्यास सुरुवात करू नका. सुरुवातीची ५ मिनिटे फ्लॅट वॉक करा. आधी सामान्य गतीने चाला आणि नंतर हळूहळू वेग वाढवा. कोणत्याही व्यायामापूर्वी शरीर ॲक्टिव्ह करण्यासाठी हा वॉक अत्यंत महत्त्वाचा आहे.

Flat Walk

हळू चाला

शेवटच्या टप्प्यात ५ मिनिटे गती एकदम कमी करून हळू चाला. वर्कआऊट झाल्यानंतर मशीन अचानक बंद करू नका. शरीर आणि हृदयाचे ठोके सामान्य स्थितीत आल्यानंतरच मशीन पूर्णपणे बंद करा.

Cool Down

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने काय होते? जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

येथे क्लिक करा...