ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लठ्ठपणाची समस्या होते
जर तुमच्याकडे जिमला जाण्याचा किंवा डाएट फॉलो करण्यासाठी वेळ नसेल तर हे सोपे उपाय वापरुन तुम्ही देखील वजन कमी करु शकता.
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध पाण्यात मिक्स करुन प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुमच्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर घरीच ३० मिनिटांचा वेळ काढून योगा करा. योगामुळे वजन कमी होते.
बाहेरचे तळलेले किंवा जंक फूड पूर्णपणे खाणं टाळा. त्याऐवजी घरामध्ये बनलेले ताजे जेवण खा.
रात्री ८ ते ९ च्या मध्येच जेवण करुन घ्या. उशीरा जेवल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही.
रात्री जेवल्यानंतर २० मिनिटे चालायची सवय लावा. यामुळे अन्नाचे पचन लवकर होते.