ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या वातावरणाचा परिणाम त्वचेवर होतो. यामुळे त्वचा ड्राय होऊन त्वचेवरील चमक निघून जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढते.
त्वचेची योग्य काळजी आणि काही घरगुती उपाय करुन तुम्ही पिगमेंटेंशन कमी करु शकता.
त्वचेवरील पिगमेंटेशन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश. म्हणून रोज सकाळी घराबाहेर जाण्याआधी सनस्क्रीनचा वापर करा.
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड राहते ज्यामुळे पिगमेंटेंशन कमी होण्यास मदत होते.
पिगमेंटेशनची समस्या कमी करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी आणि ईने समृद्ध असलेली फळं आणि भाज्यांचा समावेश करा.
स्कीन केअर रुटीनमध्ये, क्लेंजर, मॉइश्चरायजर आणि स्क्रबचा वापर करा. आठवड्यातून दोनदा स्क्रबचा वापर करा.
जर पिंगमेंटेशन जास्त असेल तर डर्मेटॉलॉजिस्टकडून सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.