5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Manasvi Choudhary

नवरात्री सण

नवरात्रीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीत माता दुर्गेची पूजा केली जाते. अनेक भाविक नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवासाचे व्रत करतात.

Navratri

बटाट्याचे पदार्थ

नवरात्रीत उपवासाला तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही बटाट्याचे चमचमीत पदार्थ बनवा.

Potato | GOOGLE

उपवासाचा चमचमीत बटाटा कीस

बटाटे सोलून त्याचा किस करा.

बटाट्याचा किस स्वच्छ पाण्यात धुवा.

कढईत गरम तेलामध्ये जिरे, हिरवी मिरची आणि किसलेला बटाटा टाका.

मंद आचेवर झाकण वाफेवर शिजवून घ्या.

यावर भाजलेल्या दाण्याचे कूट आणि सैंधव मीठ घालून गरमागरम सर्व्ह करा.

Upvas Batata Kees

क्रिस्पी बटाटा फिंगर्स

बटाटे उकडून मॅश करून त्यात साबुदाण्याचे पीठ किंवा शिंगाड्याचे पीठ मिक्स करा.

नंतर यात हिरवी मिरची पेस्ट आणि सैंधव मीठ मिक्स करा.

मिश्रणाचे लांबट गोळे करून गरम तेलामध्ये फ्राय करा.

Potato Crisp Sticks

उपवासाचे बटाटा पॅटिस

बटाटे उकडून ते स्मॅश करा.

स्मॅश केलेल्या बटाट्याचे पातळ आवरण करा.

नंतर यात ओले खोबरे, भाजलेल्या दाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि थोडी साखर हे सारण मिक्स करा

बटाट्याच्या गोळ्यात हे सारण भरून तव्यावर तेलामध्ये फ्राय करा.

Upvas Batata Patties

रसरशीत बटाट्याची भाजी

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करा.

कढईत तूप, जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या.

त्यात बटाट्याच्या फोडी, सैंधव मीठ मिक्स करा.

वरून शेंगदाणाचा कूट घाला.

Upvas Potato Gravy / Bhaji | pintrest

कुरकुरीत बटाटा भजी

बटाट्याच्या पातळ चकत्या करून घ्या.

राजगिऱ्याचे पीठ किंवा शिंगाड्याच्या पिठात मिक्स करा.

नंतर थोडे सैंधव मीठ, जिरे आणि पाणी शिजवा.

बटाट्याच्या चकत्या या पिठात घोळवून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या.

Upvas Batata Bhaji / Fritters

NEXT: Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Soaked Walnut Vs Dry Walnuts
येथे क्लिक करा..