जिमला जाण्याऐवजी 'या' 5 चटणी खा, वजन झटक्यात होईल कमी

Manasvi Choudhary

वजन कमी करण्यासाठी उपाय

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. परंतू तुम्हाला माहितीये का? तुम्ही खात असलेल्या या 5 चटण्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. घरी बनवलेल्या चटण्यांमध्ये कॅलरीज कमी असते. फायबरचे प्रमाण जास्त असते.

Weight Loss Chutneys

कोथिंबीर पुदीन्याची चटणी

कोथिंबीर आणि पुदीना मिक्स करून बनवलेली चटणी तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता. यासाठी तुम्हाला कोथिंबीर, पुदीना, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस हे साहित्य घ्यायचे आहे.

Coriander Mint Chutney

बनवण्याची सोपी पद्धत

कोथिंबीर आणि पुदीन्याची पाने धुवून बारीक चिरून घ्या.

मिक्सरच्या भांड्यात ही पाने आणि लिंबाचा रस मीठ टाकून वाटून घ्या.

Weight Loss Chutney Recipe

टोमॅटो लसूण चटणी

टोमॅटो आणि लसणाची चटणीमधील घटक वजन कमी करण्यास गुणकारी मानले जातात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

Tomato Garlic Chutney

चटणी बनवण्याची सोपी पद्धत

चटणी बनवण्यासाठी टोमॅटो बारीक कापून घ्या.

गॅसवर एका तव्यावर टोमॅटोचे तुकडे मीठ आणि लसूण घालून परतून घ्या.

नंतर त्याची साल काढून चांगले कुस्करून घ्या.

मिक्सरमध्ये लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर हे मिश्रण वाटून घ्या.

Weight Loss Chutney Recipe

नारळ कढीपत्ता चटणी

नारळमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. कढीपत्ता हा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Coconut Chutney | GOOGLE

चटणी बनवण्याची सोपी पद्धत

नारळ कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी गॅसवर खोबरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले चांगले भाजून घ्या.

या मिश्रणात तेल वापरू नका,

मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण, हिंग, लिंबाचा रस आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या.

Weight Loss Chutney Recipe | yandex

सफरचंद आणि दालचिनी चटणी

दालचिनी हा स्वयंपाकघरातील मसाला आणि जो अनेक पदार्थामध्ये वापरला जातो. वजन कमी कऱण्यासाठी देखील दालचिनी फायदेशीर आहे.

Apple Cinnamon Chutney

चटणी बनवण्याची सोपी पद्धत

सफरचंद आणि दालचिनी याची चटणी तुम्ही घरीच बनवू शकता या साठी तुम्हाला सफरंद बारीक कापून शिजवून घ्याचा आहे.

नंतर त्यात दालचिनी पावडर, जायफळ, लिंबाचा रस आणि मीठ घालून चटणी बनवा.

Apple Chutney

कच्चा आंब्याची चटणी

कच्च्या आब्यांमध्ये कॅलरीज कमी असते त्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.

Raw Mango Red Chutney

बनवण्याची सोपी पद्धत

कच्चा आंब्याची चटणी बनवण्यासाठी आंबे सोलून त्याचे बारीक तुकडे करा.

एका कढईमध्ये गरम तेलामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.

नंतर या मिश्रणात लसूण, किसलेला खोबरा आणि मीठ मिक्स करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Raw Mango Chutney | pintrest

NEXT: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास पुरूषांनी कशी काळजी घ्यावी?

येथे क्लिक करा..