ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बरेच लोक आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतात.
पण, तुम्हाला माहिती आहे का लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते व्यायाम सर्वोत्तम आहेत, जाणून घ्या.
हाय इंटेनसिटी इन्टरवलल ट्रेनिंग करा. यामध्ये (HIIT) प्रत्येक ३० सेकंदात बर्षीज, माउंट क्लाइम्बिंग आणि उडी मारणे यांचा समावेश आहे.
दुसरे म्हणजे कोबरा पोज. ३०-६० सेकंदांचा एक सेट असे ३-४ वेळा करा. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
तिसरे म्हणजे, क्रंचेस. यामध्ये, पाठीवर झोपून गुडघे वाकवा, डोक्यामागे हात ठेवा आणि हळूहळू स्वतःला वर करा आणि ३ सेटमध्ये १५-२० वेळा करा.
चौथे आणि अत्यंत फायदेशीर व्यायाम म्हणजे स्कवॉट्स. १५ ते २० वेळा स्कवॉट्स करा. असे ३ ते ४ सेट करा.
योगासन आणि स्ट्रेचिंगमध्ये सूर्यनमस्कार, नौकासन आणि भुजंगासन करा.