Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जीमला जातात. मात्र बिझी शेड्यूलमुळे अनेकदा जीममध्ये जायला वेळ मिळत नाही.
अशावेळी तुम्ही घरीच अवघ्या ५ मिनिटांत योगा करू शकता. हे योगा प्रकार केल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी दोरीउड्या अत्यंत प्रभावी व्यायाम आहे. दोरीच्या सहाय्याने तुम्ही घरीच उड्या मारा यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते वजन कमी होण्यास मदत होते.
जमिनीवर पालथे झोपून शरीराचा भार हात- कोपरांवर आणि पायाच्या अंगठ्यावर ठेवा. यामुळे पोटाच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो, ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होऊन पोट सपाट होण्यास मदत होते.
एकाच जागेवर उभे राहून धावल्यासारखी अॅक्शन करा. धावताना गुडघे तुमच्या छातीपर्यंत आले पाहिजेत.
चटईवर उलटे झोपा. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवा.आणि दोन्ही पाय जमिनीपासून थोडे वर उचलून हवेतच एकापाठोपाठ एक वर-खाली करा यामुळे पोटावरची चरबी कमी होते.
पुश-अप्स स्थितीत आता पर्वतावर वेगाने चढल्यासारखे करत, एक-एक गुडघा आलटून-पालटून छातीच्या दिशेने पुढे आणा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.