Manasvi Choudhary
चटणी कोणत्याही पदार्थ्याला चव देते. तिखट, आंबट, गोड चटणी खायला सर्वांनाच आवडते.
तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने ५ चटणी प्रकार बनवू शकता. त्या चटण्या कोणत्या ते या वेबस्टोरीतून जामून घ्या.
भजी,वडेसोबत खाल्ली जाणारी ताज्या कोथिंबीरची चटणी. कोथिंबीरची चटणी बनवण्यासाठी तुम्ही कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, लसूण आणि मीठ या मिश्रणाची पेस्ट करा.
थंड आणि फ्रेश पुदीना चटणी तुम्ही घरीच सहज बनवू शकता. पुदीन्याची पाने, कोथिंबीर आणि थोडे दही हे मिश्रण एकत्र करून तुम्ही पुदिना चटणी बनवा.
टोमॅटो चटणी चवीला आंबट असते ही चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या, मीठ आणि गूळ या मिश्रणाची एकत्र पेस्ट करा. नंतर या मिश्रणाला मोहरी, कढीपत्ता आणि तेल याची फोडणी द्या.
ओल्या नारळाची चटणी साऊथ इंडियन पदार्थासोबत आवर्जून खातात. नारळाची चटणी बनवण्यासाठी नारळ, हिरव्या मिरच्या आणि मीठ हे मिश्रण वाटून घ्या. नंतर या चटणीला मोहरी, कढीपत्ता आणि तेल याची फोडणी द्या.
जेवताना तोंडी लावण्यासाठी शेंगदाणा चटणी तुम्ही बनवू शकता. शेंगदाणा चटणी घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणा, लसूण आणि सुक्या लाल मिरची हे मिश्रण एकत्र करा.