Manasvi Choudhary
फ्रेंच ब्रेड हेअरस्टाईल महिला व मुलींसाठी आवडती हेअरस्टाईल म्हणता येईल. ही हेअरस्टाईल कधीच ट्रेंडच्या बाहेर जात नाही.
ऑफिस, कॉलेज, लग्न कार्यानिमित्त तुम्ही फ्रेंच ब्रेड हेअरस्टाईल्स ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही केसांना हटके लूक देऊ शकता.
तुमचेही केस, लांब आणि शॉर्ट दोन्हीही असतील तरी तुम्ही अशाप्रकारे हेअरस्टाईल्स ट्राय करू शकता.
क्लासिक सिंगल फ्रेंच वेणी ही सोपी हेअरस्टाईल आहे. कपाळापासून केसांचे तीन भाग करून ही वेणी बांधायला सुरूवात होते.एथनिक व वेस्टर्न कोणत्याही लूकवर ही हेअरस्टाईल उठून दिसते.
डबल फ्रेंच वेणी हेअरस्टाईलमध्ये केसांच्या मध्यभागी भांग पाडून दोन समान भागामध्ये वेणी बांधली जाते. खास जिम, वर्कआऊट करताना तुम्ही अशी हेअरस्टाईल करू शकता.
फ्रेंच वेणी विथ बन या हेअरस्टाईलमध्ये आधी वरून फ्रेंच वेणी घाला नंतर केसांचा आंबाडा बांधायचा. लग्नकार्यात साडी आणि लेहेंग्यावर हा लुक अत्यंत रॉयल दिसतो.
साईड फ्रेंच वेणी यात एका बाजूने खोल भांग पाडून जास्त केस असलेल्या बाजूने फ्रेंच वेणी घाला. ती कानाच्या मागून खाली घ्या आणि उरलेले केस तुम्ही मोकळे सोडा किंवा त्यांची साधी वेणी बांधा.
हाफ-अप फ्रेंच वेणी ही जर तुम्हाला पूर्ण केस बांधायचे नसतील तर अशी हेअरस्टाईल करा. यात फक्त वरच्या बाजूचे थोडे केस घेऊन मध्यभागी एक छोटी फ्रेंच वेणी घातली जाते आणि खालचे केस मोकळे सोडले जातात.