ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलते वातावरण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि बदलती जीवनशैलीचा ब्लड प्रेशरसह संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.
बीपी लो झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
जर तुम्हाला थोडे चालल्यानंतर अंधुक दिसत असेल किंवा स्पष्ट दिसण्यात अडथळा येत असेल तर हे लो बीपीचे लक्षण आहे.
लो बीपीमुळे श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो. तसेच अशावेळी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या होत नाही.
सतत चक्कर येणे हे देखील लो बीपीचे लक्षण आहे.
जर तुम्हाला कोणतेही काम न करता थकवा जाणवत असेल तर हे लो ब्लड प्रेशरचे लक्षण आहे.
ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यासाठी हेल्दी पदार्थ खा. तसेच दररोज व्यायाम करा.