Manasvi Choudhary
आहारातील पोषक तत्वांची कमतरता हे दृष्टी कमजोर होण्याचे मुख्य कारण आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरात जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्सची आवश्यकता असणे महत्वाचे आहे.
५ प्रकारचे ड्रायफ्रुट्स खाऊन तुम्ही शरीरातील पोषकतत्वांची कमतरता भरून काढू शकता.
बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. व्हिटॅमिन ई हे डोळ्यांमधील निरोगी पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ज्यामुळे दृष्टी कमजोर होण्याचा धोका कमी होतो.
काजूमध्ये झिंक हे खनिज मुबलक प्रमाणात आढळते. झिंक हे यकृतामधून व्हिटॅमिन 'ए' डोळ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे डोळ्यांची नजर तीक्ष्ण होते.
मनुक्यांमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल्स असतात. हे घटक दिवसभर स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण आणि थकवा दूर करतात
खजूरमध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यातील कोरडेपाणी कमी करते. खजूर खाल्ल्याने डोळ्यांमधील ओलावा टिकून राहतो यामुळे डोळ्यांची जळजळ होत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.