ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलांच्या चुकीवर पालकांचे रागवणे स्वाभाविक असते. परंतु रागामध्ये मुलांशी बोलताना योग्य शब्द वापरणे गरजेचे असते.
पालकांनी नेहमी हे लक्षात ठेवावे की रागात मुलांना हे पाच शब्द बोलू नये.
मुलांना कधीच असे बोलू नका की, तू काही करु शकत नाही. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.
तु जन्मालाच आला नसता तर बर झालं असतं. हे शब्द मुलांना कधीच बोलू नका. यामुळे त्यांच्या भावना दुखवू शकतात.
मुलांना तू शांत राहा तुझ्या शब्दांना काही महत्व नाही असे बोलू नका.
मुलांना कधीच अस बोलू नका की, मला तुझी लाट वाटते. यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.
तुम्ही नेहमी चुकीचे काम करता असे शब्द ऐकून मुलांमध्ये चुकीच्या भावना निर्माण होऊ शकतात.