पावसाळ्यात केस खूप गळतायत? मग आजपासूनच खायला सुरू करा 'हे' 5 पदार्थ

Manasvi Choudhary

केसांची समस्या

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाचे पाणी केसांमध्ये गेल्यानंतर केस चिकट होणे, टाळूला खाज सुटणे आणि केसगळती या समस्या उद्भवतात.

Monsoon Hair Care Tips

घरगुती उपाय करा

यावर उपाय म्हणून अनेकजण बाजारातील केमिकल्स उत्पादनांचा वापर करतात मात्र यामुळे केस आणखी खराब होऊ शकतात यासाठी तुम्ही घरगुती सोप्या पद्धतीचा वापर करा. आहारातील मुख्य घटक केसांसाठी फायदेशीर असतात.

Monsoon Hair Care Tips

आहारात या पदार्थांचा कसा समावेश

केस गळणे थांबवण्यासाठी केसांना दही आणि कांद्याचा रस लावतात यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. मात्र तुम्हाला माहितीये का? आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने केस मजबूत होतात केसांची वाढ होते.

Curd And Onion | pinterest

अंडी

केस निरोगी ठेवण्यासाठी अंडी खाणे फायदेशीर आहे. अंड्यामध्ये प्रथिने आणि बायोटिन हे गुणधर्म असतात. जे टाळूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आठवड्यातून दोन ते तीन अंडी खा. केसांची मजबूती टिकवण्यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ अंडी आवर्जून खावीत.

Eggs

बदाम आणि अक्रोड

बदाम आणि अक्रोड हे केसांसाठीचे सर्वोत्तम सुपरफूड मानले जाते. यामध्ये प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् आणि व्हिटॅमिन ई ही पोषक तत्वे असतात. दररोज सकाळी ४ ते ५ भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.

Almonds & Walnuts

भोपळा आणि जवसाच्या बिया

भोपळा आणि जवसाच्या बिया केसांच्या मुळांना घट्ट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यामध्ये ओमेगा-३, झिंक, प्रथिने आणि लोह हे घटक असतात. जे केस गळती कमी करतात

Flax & Pumpkin Seeds

पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या

पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे ही आवश्यक पोषक तत्वे असतात. लोहाच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये केस गळतीचे प्रमाण जास्त असते. हिरव्या भाज्या खाल्ल्याने केसांच्या मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि मुळे मजबूत होतात.

Green Leafy Vegetables

आवळा, संत्री आणि लिंबू

व्हिटॅमिन सी युक्त फळे शरीरातील कोलेजन वाढवण्यास मदत करतात. कोलेजनमुळे केसांची लवचिकता वाढते आणि केस मधूनच तुटणे बंद होते. रोज एक आवळा किंवा लिंबू पाण्याचे सेवन केल्यास केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.

Vitamin C Rich Fruits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: वटपौर्णिमेनिमित्त साडीवर खुलून दिसतील 'या' 5 लेटेस्ट नथ डिझाइन्स

येथे क्लिक करा...