Manasvi Choudhary
शरीराचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम किडनी करते.
किडनीचे कार्य सुरळीत राहण्यासाठी तुम्ही आहारात कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
किडनी निरोगा कार्यासाठी तुम्ही भरपूर फळे, भाज्या आणि पाणी प्यायले पाहिजे.
लाल शिमला मिरचीमध्ये लायकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंट्स असते यामुळे किडनी निरोगी राहते.
कोबीमध्ये फायबर, फोलेट, बी6 आणि व्हिटॅमिन सी असते यामुळे कोबी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य सुरळीत होते.
ब्रोकोली या भाजीमध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा अधिक असते. यामुळे किडनीचे कार्य सुधारते.
किडनीच्या निरोगी कार्यासाठी भाज्यांमध्ये लसणाचा वापर अधिक करा. लसणातील अॅलिसीन हे गुणधर्म संसर्गापासून रोखते आणि रक्तदाब नियंत्रित करते.
सफरचंदमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि किडनीवरील ताण कमी करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.