Manasvi Choudhary
फिट राहण्यासाठी चालणे हा व्यायाम अत्यंत महत्वाचे आहे. आजकाल दररोज 10,000 पावले चालणे फिटनेस ट्रेंड बनला आहे.
मात्र अनेकजण, रोज चालण्याचा कंटाळा करतात यामुळे वजन वाढण्याचा त्रास कमी होत नाही. अशावेळी बाहेर न जाता घरच्या घरी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता.
जपिंग जॅक्स हा एक उत्तम फुल-बॉडी कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाची गती वाढते आणि संपूर्ण शरीरातील चरबी वेगाने जळण्यास मदत होते.
स्टेअर क्लिम्बिंग म्हणजेच पायऱ्या चढणे जर तुम्हाला चालण्याऐवजी दुसरा ऑप्शन हवा असेल, तर घरातील किंवा सोसायटीच्या पायऱ्या चढणे बेस्ट आहे. यामुळे पायाचे स्नायू बळकट होतात आणि कॅलरीज अतिशय जलद गतीने बर्न होतात.
बर्पी हा एक हाय-इंटेंसिटी वर्कआउट आहे. हा व्यायाम केल्याने शरीराच्या प्रत्येक अवयवावर ताण येतो आणि स्टॅमिना कमालीचा वाढतो.
स्किपिंग म्हणजेच दोरीवर उड्या मारणे हा चालण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रभावी व्यायाम मानला जातो. यामुळे हातापायांची लवचिकता वाढते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मोठी मदत होते.
तुम्हाला जर व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल, तर तुमचा आवडता म्युझिक लावून १५ ते २० मिनिटे मनसोक्त डान्स करा. हा एक सर्वात आनंददायी आणि फ्रेश ठेवणारा कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामध्ये भरपूर घाम निघतो आणि ताणतणाव दूर होतो.
येथे दिलेली माहिती ही साामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.