Manasvi Choudhary
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास वजन वाढणे, मधुमेह, थकवा आणि हृदयाचे आजार या समस्या उद्भवू शकतात.
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे तुम्ही 5 ड्रिंक्सचे सेवन करणे महत्वाचे आहे.
कारल्याचा रस रक्तातील साखरेवर निंयत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर मानला जातो. कारल्यामध्ये चारॅन्टिन आणि पॉलीपेप्टाइड-पी हे घटक असतात, जे इन्सुलिनप्रमाणे कार्य सुधरवतात.
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि हायड्रॉक्सिआयसोलेउसीन चे प्रमाण असते जे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात तसेच अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे कमी करतात.
दालचिनी केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही, तर ती रक्तातील साखर नैसर्गिकरित्या स्थिर ठेवते. दालचिनीचा चहा किंवा रस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
जास्वंदीच्या फुलांचा चहा रक्तातील साखर स्थिर ठेवते. या चहामध्ये अँथोसायनिन्ससारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाह कमी करण्यास मदत करतात.
कोरफड ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यातील घटक इन्सुलिनचे कार्य सुधरवतात. तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी कोरफडचा रस पिणे फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.