ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांना समर्पित असतो. या दिवशी धनप्राप्तीसाठी काही विशेष उपाय केले जातात.
धार्मिक श्रद्धेनुसार, हे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांचे आशीर्वाद मिळतात. यामुळे जीवनात सुख- संपत्ती आणि समृद्धी येते.
गुरुवारी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.
गुरुवारी, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर 7 पिवळ्या कवड्या आणि हळदीचा एक तुकडा ठेवा. संध्याकाळच्या पूजेनंतर, या कवड्या आणि हळद पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा.
गुरुवारच्या दिवशी, तुळशीच्या झाडाची वाळलेली मुळे गंगाजलाने धुवून पिवळ्या कापडात बांधा आणि तुमच्या घरातल्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरात पैशांची भरभराट येईल.
गुरुवारच्या दिवशी, पिवळ्या कापडात गुळाचा एक तुकडा, हळदीचे 7 तुकडे आणि । रुपयांचे नाणे बांधून ते निर्जन ठिकाणी फेकून द्या. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.
गुरुवारी धनप्राप्तीसाठी, "ओम ब्रिम बृहस्पत्ये नमः" आणि "ओम ग्रॅ ग्रॅ ग्रॅ सह गुरुवे नमः" या मंत्रांचा जप करावा.