ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचदा चार्जिंग करताना फोन अचानक खूप गरम होऊ लागतो, ज्यामुळे अनेकदा दुर्दैवी घटना देखील घडू शकते.
फोन चार्ज करताना या सोपे टिप्स वापरुन तुम्ही स्मार्टफोन सुरक्षित ठेवू शकता.
फोन चार्ज करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जाणून घ्या.
फोन नेहमी ओरिजनल चार्जरने किंवा सजेस्टेड चार्जरने चार्ज करा.
फोन कव्हर काढूनच फोन नेहमी चार्जिंगला लावा.
चार्जिंग करताना स्मार्ट फोन वापरु नये. यामुळे फोन जास्त गरम होऊ शकतो.
चार्जिंग करताना फोन कधीही गरम ठिकाणी ठेवू नये. अन्यथा फोनला आग लागू शकते.