Manasvi Choudhary
धावपळीच्या जीवनशैलीत महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. अनेकदा महिला आपल्या स्तनांच्या आकारावरून संकोच करतात. मात्र, वैद्यकीय दृष्टिकोनातून स्तनांच्या आकारापेक्षा ते निरोगी असणे जास्त महत्त्वाचे आहे.
आजकाल महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी महिलांनी आरोग्यासह ब्रेस्ट हेल्थची काळजी घेणे महत्वाचे आहे.
स्तनांच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि छातीचा भाग टोन्ड व निरोगी ठेवण्यासाठी नियमित 'योगासने' करणे अत्यंत फायदेशीर आहे.
तुमचा स्तनांचा आकार लहान, मोठा असला तरी आरामदायी वाटणे महत्वाचे आहे यासाठी आज आम्ही तुम्हाला ३ योगासने सांगणार आहोत.
भुंजगासन हा योगा प्रकार केल्याने खांदे आणि मानेचा व्यायाम होतो. पोटाचे स्नायू मजबूत होतात यामुळे संपूर्ण पाठ आणि खांद्याचा व्यायाम होतो.
सेतुबंधासन केल्याने मान, छाती आणि मांड्याचे आतील स्नायू ताणले जातात.
उष्ट्रासन हा व्यायाम प्रकार छाती, पोट आणि मांडीचे स्नायू मजबूत करते. उष्ट्रासनामुळे मान मागे वाकते यामुळे मानेवरील ताण कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.