ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हवामानातील बदलामुळे घशात सूज येणे किंवा घसा खवखवणे हे सामान्य आहे.
जर तुम्हालाही घशाच्या खवखवण्याचा किंवा दुखण्याचा त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून गुळण्या केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.
मिठामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात जे घसा खवखवणे आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
आलं घशातील सूज कमी करण्यास मदत करते. तर मधामध्ये अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
एक चमचा मध घ्या. यामध्ये थोडं आल्याचा रस घाला. दिवसातून दोनदा याचे सेवन करा.
घशाच्या संसर्गाशी तुळशीची पाने प्रभावी ठरु शकतात. तुळशीची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने घशातील खवखवण्याची समस्या दूर होऊ शकते.