Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू होताच सर्वांना बाहेर फिरायला जाण्याचे वेध लागतात. मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी कोणती ठिकाणे बेस्ट आहेत.
उन्हाळ्यात तापमान उष्ण असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागते अशावेळी सुट्टीचे नियोजन करताना योग्य विचार करावा लागतो.
एप्रिल- मे महिन्याचा वातावरणात उष्णता वाढलेली असते अशावेळेस तुम्ही थंड ठिकाणांना भेट देणे फायदेशीर राहील.
उन्हाळ्यात उष्ण वातावरणात खालील ३ ठिकाणांना भेट देऊ नका.
जैसलमेर हे फिरण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाण आहे. मात्र एप्रिल- मे महिन्यात या ठिकाणी उष्ण वारे वाहू लागतात येथील तापमान 34 ते 38 अंशापर्यंत पोहोचू शकते.
मसुरी म्हटल्यावर तुम्हाला नजरेसमोर थंड हवामान लक्षात येते मात्र मे- एप्रिल महिन्यात येथील हवामानात बदल होऊ शकतो. जर तुम्ही मसुरी जाण्याचा प्लान करत असाल तर हवामान तपासून नियोजन करा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत, मित्र मैत्रिणीसोबत आग्रा जाण्याचा विचार करत असाल तर उष्णता तापमान तपासून नियोजन करा. मार्च- एप्रिलमध्ये येथील हवामानात झपाट्याने बदल जाणवतो त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.