Night Skin Care : वय कमी, पण चेहऱ्यावरून दिसता म्हातारे; रात्रीच्या ३ चुका ठरताहेत कारणीभूत

Shreya Maskar

स्किन केअर

रात्रीची वेळ त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण या काळात त्वचा स्वतःची दुरुस्ती करत असते. मात्र, रात्रीच्या स्किनकेअर रूटीनमध्ये काही छोट्या चुका केल्यास, तुमची त्वचा अकाली वृद्ध होऊ शकते.

Skin Care | pinterest

पहिली चूक

रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर मेकअप किंवा धूळ-माती तशीच ठेवून झोपणे. चेहरा स्वच्छ न करणे.यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही आणि तिच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेत अडथळा येतो. परिणामी, चेहऱ्यावर मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स वाढू लागतात.

First Mistake | pinterest

दुसरी चूक

मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम न लावल्यामुळेही त्वचा अकाली वृद्ध होऊ शकते. रात्रीच्या वेळी त्वचेला ओलावा आणि पोषणाची सर्वाधिक गरज असते. जर त्वचेला पुरेसा ओलावा मिळाला नाही, तर ती कोरडी, खडबडीत आणि निर्जीव दिसू लागते.

Second Mistake | pinterest

तिसरी चूक

रात्रीच्या वेळी चुकीच्या उत्पादनांचा वापर करणेही त्वचेसाठी हानिकारक ठरते. ज्या फेस वॉश किंवा क्रीममध्ये अतिप्रमाणात रसायने किंवा तीव्र घटक असतात, ते त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर कमकुवत करतात. यामुळे त्वचा संवेदनशील बनते आणि लालसरपणा, जळजळ किंवा ॲलर्जीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Third Mistake | pinterest

नाईट स्किनकेअर रूटीन

योग्य नाईट स्किनकेअर रूटीन पाळण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून धूळ आणि मेकअप काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Night Skincare Routine | pinterest

नाईट क्रीम

त्यानंतर तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नाईट क्रीम किंवा जेल लावा, जेणेकरून रात्रभर त्वचेला पोषण आणि ओलावा मिळेल.

Night Cream | pinterest

निरोगी-चमकदार त्वचा

आठवड्यातून दोन ते तीन वेळा टोनर किंवा सीरमचा वापर केल्यास त्वचेची छिद्रे स्वच्छ राहतात आणि त्वचा निरोगी व चमकदार दिसते.

Healthy, Radiant Skin | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मध्यरात्री अचानक मध्येच उठून चालायला लागता? सावधान! शरीर देतंय 'या' आजाराचा संकेत

Sleeping Issues | AI PHOTO
येथे क्लिक करा...