Manasvi Choudhary
कोरडी त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील काही सोपे उपाय करू शकता.
मध हे नैसर्गिकरित्या फायदेशीर आहे. मध हे ओलावा त्वचेवर साठवून ठेवते. चेहऱ्यावर मध लावून त्यानंतर ५ ते १० मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ धुवा.
दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेचा कोरडेपणा दूर करून रंग उजळवण्यास मदत करते.
कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल किंवा साजूक तूप हे सर्वात प्रभावी आहे. रात्री झोपण्यापूर्वी हातावर ३-४ थेंब तेल किंवा तूप घेऊन चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा.
चेहरा धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका, यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.
त्वचा थोडी ओली असतानाच मॉइश्चरायझर किंवा तेल लावल्यास ओलावा जास्त काळ टिकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.