Saam Tv
तुम्ही नेहमी बाहेर तयार केलेली दाबेली खात असाल. मात्र आता तु्म्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यात दाबेली बनवू शकता.
तुम्हाला दाबेली तयार करण्यासाठी सगळ्यात कमी वेळ लागतो. ती एक झटपट रेसिपी आहे. चला तयार पाहुया रेसिपी.
एका भांड्यात २ चमचे तेल करा. त्यात कश्मिरी लाल मिरची, हळद , धने , मीठ आणि बाजारातला दाबेली मसाला घाला.
हे मसाले भाजल्यावर त्यात पाणी घाला. मग त्यात उकडलेले दोन बटाटे घाला.
सगळे मिश्रण एकत्र केल्यावर त्यात शेंगदाणे आणि आवडीनुसार चिंचेचे पाणी घाला.
आता एक पाव घ्या. त्यात इमली चटणी, लसून चटणी दाबेली स्टफिंग आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
पुढे तुम्ही तवा गरम करुन त्यावर बटर घाला. आता पाव क्रिस्पी होई पर्यंत भाजून घ्या.
शेवटी तुम्ही चिरलेला कांदा , डाळिंबाचे दाणे, बारिक शेव दाबेलीवर टाकून घ्या.
तुम्ही घरी असलेल्या साहित्याने सुद्धा दाबेली सजवू शकता. आता तुम्ही गरमा गरम टेस्टी आणि क्रंची दाबेली खावू शकता.