Sakshi Sunil Jadhav
आत्मविश्वास भरपूर वाढलेला असेल त्याचा करिअरमध्ये पूरेपूर फायदा करून घ्यायचा. गरिबांना अन्नदान केल्यास विशेष लाभ होईल.
अध्यात्मिकतेकडे कल असेल. पारिवारिक सुख भेटेन. अगदी निवांत दिवस आहे. शक्य झाल्यास परिवारासोबत फिरायला गेल्यास उत्तम.
मानसिक ताण जाणवेल, कुलदेवीची उपासना केल्यास लाभ होईल. विशेष निर्णय घेण्यास टाळलेलं बरं.
अतिशय उत्साहात दिवस जाईल. नवीन वस्तू खरेदी करण्यास उत्तम दिवस. पोटाचे थोडेफार विकार होतील काळजी घ्यावी.
नवनवीन लोकांसोबत परिचय होतील. आर्थिक लाभ होईल. दातांच्या समस्या जाणवतील. अन्नदान केल्यास विशेष लाभ होईल.
विद्यार्थ्यांसाठी कसोटीच्या परिक्षेचा दिवस असेल. गणपतीची उपासना केल्यास लाभ होईल. व्यावसायिकांसाठी फायदेशीर संधी सहज उपलब्ध होतील.
शक्य असल्यास सोनं खरेदी कराव, शुभलक्षण राहिल. प्रेमात यशस्वी व्हाल. श्रीखंड किंवा दही खाऊन घराबाहेर पडावं, आनंदीआनंद होईल.
पूर्वी केलेल्या कार्याची शुभ फलशृती भेटेन. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वाहन काळजीपूर्वक चालवा. आर्थिक व्यवहार टाळावे.
पति/पत्नी सोबत वाद टाळावेत. वाचनात दिवस घालवलेला योग्य. कुणालाही शब्द देणं टाळाव. शंकराची उपासना केल्यास विशेष लाभ होईल.
विशेष आर्थिक लाभ होईल. शक्य तेवढे मौन पाळावे. नौकरीत बदल करायचा असल्यास आजच निर्णय घ्यावा. शनि उपासना करावी.
परिवारातील प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं टाळावं. मित्रांपासून सावध राहा. मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावं नारळ वाढवू नये.
चारो उंगली घी मे और सर कढाई मे, असा एकंदरीत आजचा दिवस आहे. काहीही करा उत्तम दिवस आहे. नवीन वस्त्र खरेदी केल्यास विशेष लाभ होईल.