Manasvi Choudhary
नियमित चालण्यामुळे हृदयाची गती सुधारते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
रोज चालल्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने बर्न होतात. पचनक्रिया सुधारून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
जेवणानंतर चालल्याने पचनसंस्थेला चालना मिळते. पोट फुगणे, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात.
चालण्यामुळे पाय, कंबर आणि पोटाचे स्नायू बतात. हाडांची घनता वाढून सांधेदुखी किंवा ऑस्टिओपोरोसिसचा धोका टळतो.
चालताना शरीरात 'एंडॉर्फिन्स' नावाचे आनंदी हार्मोन्स सक्रिय होतात. यामुळे ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मन प्रसन्न राहते.
जे लोक नियमित चालतात, त्यांना रात्री गाढ आणि शांत झोप लागते. निद्रानाशाची (Insomnia) समस्या दूर होण्यास मदत होते.
नियमित चालल्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींचे कार्य सुधारते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
चालताना आपण दीर्घ श्वास घेतो, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते.
थकवा जाणवत असल्यास हलके चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि संपूर्ण शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते.
नियमित चालण्यामुळे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते, स्मरणशक्ती तल्लख होते
चालण्यामुळे शरीराची आळस निघून जाते आणि स्नायू लवचिक होतात.
चालण्यामुळे घामावाटे शरीरातील विषारी घटकबाहेर पडतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
गुडघे किंवा पायांच्या सांध्यांची हालचाल झाल्यामुळे सांधे लवचिक आणि मजबूत होतात.
दररोज नित्यनियमाने चालल्याने शरीराचा स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढते, ज्यामुळे आपण दिवसभर तंदुरूस्त राहतो.
नियमित चालण्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.
चालणे हा एक असा व्यायाम आहे जो कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकते. यामुळे शरीर निरोगी राहून आयुष्य वाढते.
चालण्यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
शरीरातील चयापचय क्रिया वेगवान झाल्यामुळे लठ्ठपणा आणि वाढलेले पोट कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
NEXT: Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर